मुंबई

मुलांमध्ये अॅडिनो व्हायरस संसर्ग

CD

‘अॅडिनो’ विषाणूसंकटापासून मुंबई तूर्त दूर
पुण्यामधील संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पुण्यात लहान मुलांमध्ये अॅडिनो व्हायरसचा संसर्ग वाढला असून मुलांमध्ये ताप, टॉन्सिल्स वा घशाबाबतच्या काही तक्रारी दिसल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत अद्याप असा संशयित संसर्ग दिसून येत नसल्याचे बालतज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून मुलांमध्ये ताप येणे, टॉन्सिल्स दुखणे, घसा खवखवणे आदींसह डोळ्यातील लाली अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे ॲडिनो विषाणू संसर्गाची असून ५ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये प्रामुख्याने ती आढळून येत आहेत. त्यात अचानक वाढ झाली असून गेल्या महिनाभरात संसर्ग बळावत असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील पार्श्वभूमीवर मुंबईतील मुलांमधील आजाराच्या लक्षणांबाबत बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली. त्याबाबत बोलताना अपोलो हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. अमित शोभावत यांनी मुंबईतील मुलांमध्ये अद्याप तरी अशी लक्षण दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, संबंधित आजार विषाणूजन्य असल्याने मुलांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करत आहेत.

रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या मुलांना जपा
अॅडिनो विषाणूच्या संसर्गामुळे मुलांची श्वसननलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्ग इत्यादी भागांना बाधा पोहचते. परिणामी सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि मूत्रमार्गाच्या तक्रारी उद्‍भवू शकतात. अशा विषाणूजन्य आजाराचे अनेक प्रकार आहेत. अॅडिनो व्हायरस गुंतागुंतीचा असून त्यामुळे न्यूमोनियासारखे आजार जडू शकतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Vaibhav Suryavanshi ची राजस्थान रॉयल्सच्या संघसहकाऱ्यांना मोठ्ठी बर्थडे पार्टी; बिल बघून म्हणाला, 'खूपच महाग आहे, पण...',

'कदाचित तिचा फोन नंबर आता तो...' एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले...

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

SCROLL FOR NEXT