मुंबई

भाईंदरमध्ये वधूवर परिचय मेळावा उत्साहत

CD

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदर पूर्वच्या नवघर परिसरात ‘लग्नठरले.कॉम’ या संस्थेच्या वतीने नुकतेच वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लग्नठरले.कॉम’ ही संस्था मिरा-भाईंदर शहरात गेल्या दोन वर्षांपासून तरुण-तरुणींची लग्न जुळवण्याचे काम करत असून संस्थेच्या माध्यामातून आजपर्यंत ५० हुन अधिक जणांची लग्न जुळवून देण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थापक विनोद कदम यांनी दिली. संस्था आजवर ऑनलाइन पद्धती काम करत होती, मात्र आता ऑफलाईन पद्धतीने देखील सेवा देण्याचे संस्थेने ठरवले आहे. संस्थेने आयोजित केलेल्या वधूवर परिचय मेळाव्याला ३५३ जणांची नोंदणी केली होती. या मेळाव्यादरम्यान एखाद्याला पुढील बोलणी करायची असेल तर त्याकरता ‘मॅजिक बॉक्स’ नावाची सुविधाही संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT