मुंबई

बोईसरमध्ये कारवाई केलेल्या जागेवर अनधिकृत इमारत

CD

मनोर, ता. १५ (बातमीदार) : बोईसर आणि परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. पालघरच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आलेल्या इमारतीच्या जागेवर वर्षभरात पुन्हा इमारत उभी राहिली आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीत नवापूर रस्त्यावर अवधनगर भागात मुख्य रस्त्यालगतच सर्वे क्र.९२ प्लॉट क्र.२१ या भूखंडावर दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम पूर्ण केले आहे. या आधी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत या जागेवरील अनधिकृत बांधकाम उध्वस्त केले होते. कारवाई केल्यानंतर वर्षभरातच या जागेवर पुन्हा दोन मजली अनधिकृत इमारत दिमाखात उभी राहली आहे. वर्षभरापासून अवैध इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या विरोधात नागरीकांनी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच दोन वेळा तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा त्याच जागेवर अवैध बांधकाम करण्यासाठी भूमाफीयांची हिमत होते कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे सरावली परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या आणि अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी जागा मिळत नसताना अनधिकृत इमारती उभ्या करण्यासाठी भूमाफीयांना मात्र सरकारी जागा राजरोसपणे उपलब्ध होत आहेत. अवधनगरच्या दोन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई आणि शासकीय जमिनींवर अतिक्रमण करून इमारती उभारून विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
....
सरावली येथील अनधिकृत दोन मजली इमारतीच्या बांधकामावर कारवाई करून बांधकाम निष्कासित केले जाईल.
- सुनील शिंदे, तहसीलदार पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT