मुंबई

प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

CD

मुंबई, ता. १६ : मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज (ता. १६) पत्रकार परिषद घेत विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

प्रा. नलगे यांनी कथा, कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन आदी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. ८७ वर्षे वय असलेल्या नलगे यांना यापूर्वी विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक, तसेच राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०२२ च्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

श्री. पु. भागवत पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनाला जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रकाशित ग्रंथांची संख्या १,२४० असून ४८ वर्षे कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.

कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तींसाठी) द. ता. भोसले यांना जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्त्वाची पुस्तके, खेड्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्षे ते कार्यरत आहेत. डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेला जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेची स्थापना सन १९०६ मधील असून मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत, विविध साहित्य प्रकारातील ४० हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात. लेखन कार्यशाळेसारखे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवण्यात येतात.

कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) रत्नागिरीतील कोकण मराठी साहित्य परिषद यांना जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेची स्थापना १९९९ मधील असून मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत असताना साहित्य संमेलने, लेखक वाचक संवाद, लेखनकार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवण्यात येतात.

वऱ्हाडी बोलीच्या संशोधनाची दखल
डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) दिला जाणारा पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, देश-विदेशात काव्य वाचनातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कादंबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT