मुंबई

लोकअदालतीच्या माध्यमातून साडे तीन कोटींची वसुली

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः लोकअदालतीद्वारे थकीत मालमत्ता करधारकांना बजावण्यात आलेल्या नोटिसीचा महापालिकेला चांगला फायदा झाला आहे. नोटीस मिळाल्यानंतर बऱ्याच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत साडे तीन कोटींपेक्षा जास्त रकमेचा कर भरणा केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पालिकेला फलश्रुती ठरली आहे.
लोकअदालत या संकल्पनेद्वारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नवी मुंबईत बेलापूर येथे करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन व पोस्टलिटीगेशन असे दोन प्रकारचे वाद ठेवण्यात आले होते. यामध्ये नागरिक, व्यापारी, शासकीय – निमशासकीय संस्था, उद्योग समूह अशा विविध घटकांचा समावेश होता. नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर न भरणा-या थकबाकीदांना दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर बेलापूर यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच २५ हजार रक्कमेपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता करदात्यांच्या नावे न्यायालयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्था कर आणि उपकर हे आता बंद झाले असून त्याजागी वस्तू सेवा कर (जीएसटी) सुरू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी उपकर आणि स्थानिक संस्था कर याची थकबाकी अद्याप भरलेली नाही अशा थकबाकीदारांना देखील न्यायालयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. स्मॉल स्केल इंटरप्रिनर असोसिएशन यांनी सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे याचिका दाखल करून व्याज आणि दंड भरण्यासाठी स्थगिती आदेश प्राप्त केले आहेत. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना मुद्दल भरण्यासाठी लोकअदालतीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. लोकन्यायालयाच्या नोटीस प्राप्त झाल्यावर संवेदनशील व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन नवी मुंबई महापालिकेकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर आणि उपकर याच्या थकीत रकमेचा भरणा केला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील थकीत करदात्यांनी देखील लोकन्यायालयाच्या नोटिशीला प्रतिसाद देऊन थकीत मालमत्ता कर भरला आहे.
-------------------------------
मालमत्ता कर व एलबीटी आणि सेस थकीत रक्कमेच्या वसुली प्रकरणी तालुका विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत दावा दाखल करण्यापूर्वीचे सूचनापत्र ९०० हून अधिक जणांना पाठविण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत थकबाकीदारांनी एलबीटी आणि सेसचा ९२ लाख रक्कमेचा भरणा तसेच मालमत्ताकराचा १ कोटी ४ लाख ९२ हजार ९२३ इतक्या रक्कमेचा भरणा केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी लोकअदालतीनंतर दिली. त्याचप्रमाणे लोकअदालतीनंतर एक आठवड्याच्या कालावधीत एलबीटी आणि सेसच्या थकबाकीदारांनी १ कोटी ५ लाख रक्कमेचा भरणा केलेला आहे.
-------------------------------
काही थकबाकीदार मालमत्ता कराची रक्कम विहित वेळेत भरत नाहीत अशा थकबाकीदार मालमत्ता कर धारकांसाठी नवी मुंबई महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर १६ मार्च ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत दंडात्मक रकमेवरील सूट कमी होऊन ५० टक्के इतकीच सूट दिली जाणार आहे.
--------------------------------
तरी नागरिकांनी आपल्या थकीत मालमत्ता कराची रक्कम त्वरित भरून दंडात्मक रक्कमेवर भरघोस सूट मिळवावी. अभय योजना जाहीर करूनही तिचा लाभ न घेता आपली थकबाकी तशीच ठेवणार्‌या थकबाकींविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT