मुंबई

डोंबिवलीतील डॉक्टरची कोट्यवधीची फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : डोंबिवली एमआयडीसीतील डॉक्टरांना कोट्यवधींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एक कोटी रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत चेन्नई येथील नॅरिक्स होल्डिंग, क्रोना ग्रोथ कंपन्यांच्या पाच संचालकांनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २३) तक्रार दाखल केली. चेन्नई येथील कंपनीचे संचालक कृष्णन अय्यपन, बलराज अनिता, एस. कुमार, भास्कर, शेखर अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीत राहणारे डॉ. हर्षवर्धन ठाकूर यांना डिसेंबर २०२० मध्ये चेन्नई येथील कंपनीने दहा कोटी रुपये कर्ज देण्याचे आश्वासन दिले. हे कर्ज मंजूर प्रक्रियेसाठी कंपनीच्या संचालकांनी डॉ. ठाकूर यांना काही रक्कम भरणा करण्यास सांगितली. त्यानुसार डॉ. ठाकूर यांनी टप्प्याटप्प्याने कंपनीच्या बॅंक खात्यात एकूण ८२ लाख ५० हजार रुपये जमा केले. कर्ज मंजूर प्रक्रियेसाठी आवश्यक रक्कम भरणा करूनही कंपनी कर्ज देण्यास टाळाटाळ करत होती. दोन वर्षे होत आले तरी कर्ज मिळत नसल्याने डॉ. ठाकूर यांनी कंपनी संचालकांकडे पैसे परत मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत होते. त्यानंतर संचालकांनी डॉ. ठाकूर यांना ३० लाख ३० हजार रुपये परत केले. उर्वरित ५२ लाख २० हजारांची रक्कम परत करण्यासाठी तगादा लावूनही ती रक्कम कंपनीने परत केली नाही. तसेच डॉ. हर्षवर्धन यांचे मित्र हेमंत पांडुरंग देशमुख यांची या व्यवहारात ३६ लाख ९० हजार रुपये, अनिल राजाराम धमाले यांची १७ लाख ५० हजार रुपये आणि डॉक्टरांचे सल्लागार यांची दोन लाखांची रक्कम अडकून पडली.


कंपनीकडून रक्कम परत मिळावी, म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करूनही संचालकांनी त्यास दाद दिला नाही. अखेर कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर डॉ. हर्षवर्धन ठाकूर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT