मुंबई

पुढील पंधरा वर्षे केंद्रात भाजप सरकार

CD

कर्जत, ता. २४ (बातमीदार) : जम्मू आणि काश्‍मीरसंदर्भातील ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर त्या राज्यातील हिंसाचार घटला आहे. राज्यात सुव्यवस्था असल्याने पर्यटकांची संख्या वाढल्याने अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेणे, शक्य झाले. पुढील १५ वर्षे केंद्रात भाजपचे सरकार राहणार आहे; मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.

कौटुंबिक शुभ सोहळ्यासाठी तावडे हे दोन दिवसांच्या कर्जत मुक्कामी आहेत. तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी केली होती. त्यानुसार शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला त्यांनी भेट दिली होती. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत, पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन-तृतीयांश जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. १९९५ ते २००४ दरम्यान कर्जतला नेहमी येत असे. त्या वेळचे कर्जत आणि आताच्या शहरामध्ये खूप फरक बघायला मिळत आहे. परिसराचा विकास खूप झपाट्याने झाला असल्याचे त्यांनी म्हटले. कर्जतचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय चाचड यांचे पुत्र अमित चाचड, तसेच गुंडगे येथील राज सूरज बली यादव आणि रितिका यादव यांनी तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सुनील गोगटे, कल्पना दास्ताने, संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT