मुंबई

फेरीवाला धोरणसाठी हालचाल

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : शहरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या फेरीवाल्यांकडून रस्ता अडवून दुकाने थाटण्यात येत असल्यामुळे पदपथावरून चालताना नागरिकांना वाट काढावी लागते. ही बाब लक्षात घेऊन फेरीवाला धोरण निश्चित करण्यात आले आहे. आता १ हजार ३६७ फेरीवाल्यांची यादी अंतिम केली आहे. त्यात फेरीवाल्यांना जागा देणे, फेरीवाला कमिटीची निवडणूक घेणे आदींबाबत येत्या आठवड्यात बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीनंतर फेरीवाल्यांची कमिटी अंतिम करून ती कामगार आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविली जाणार आहे. त्यानंतर फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाण्यात आजही गर्दीच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. अशातच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात ठाण्याच्या बाहेरील फेरीवाले येऊनही या ठिकाणी व्यवसाय थाटतात. फेरीवाला धोरण राबविण्यासाठी २०१९ मध्ये ठाणे पालिकेने सर्व्‍हे केला असता, शहरात केवळ सहा हजार ३३२ फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी प्रशासनाकडे पुरावे सादर केले होते. आता फेरीवाला धोरण अंतिम होत असताना हा आकडा एक हजार २३० च्या घरात आला आहे.

फेरीवाल्यांची पहिली यादी पालिकेने जाहीर केली. या यादीत नावात किंवा इतर काही बदल असतील, तर ते १२ ऑगस्ट पर्यंत करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार आतापर्यंत पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत ३८ हरकती, सूचना प्राप्त झाल्या असून त्या निकाली काढण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यातील एक हजार २३४ फेरीवाले अंतिम करण्यात आले आहेत. परंतु सर्व्‍हे सुरू असल्याने त्यात वाढ होऊन ही संख्या आता एक हजार ३६७ एवढी झाली आहे. मागील काही वर्षे फेरीवाला समितीची बैठक न झाल्याने फेरीवाला धोरण अंतिम होऊ शकले नव्हते; परंतु आता पुढील आठवड्यात ही बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
-------------------------------
लवकरच कमिटी नियुक्‍त
बैठकीत फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्यासह कमिटीची निवड करणे, त्यातील सदस्य कोण कोण असतील, त्यावर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय फेरीवाल्यांसाठीचे रजिस्ट्रेशन चार्जेस किती असावेत, याबाबत ‍आवश्‍‍यक बदल करण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. तसेच फेरीवाला कमिटी अंतिम झाल्यानंतर ती कामगार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT