मुंबई

हात रुमालातून चक्क लग्नाचे निमंत्रण

CD

कासा, ता. २ (बातमीदार) : सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. यात आपला विवाह सोहळा जरा हटके असावा यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. यात स्टेजच्या सजावटीपासून आमंत्रणासाठी देण्यात येणाऱ्या पत्रिका अधिक आकर्षक असाव्यात यासाठी आग्रह धरला जातो; पण डहाणूमधील एका कुटुंबीयाने चक्क हात रुमालावर पत्रिका छापून अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक असलेल्या रवींद्र दामसे यांनी आपल्या मुलाची लग्न पत्रिका वेगळपण जपत हात रुमालावर छापली आहे. त्यांनी पांढऱ्या शुभ्र हात रुमालावर ही पत्रिका छापली आहे. ही पत्रिका आकर्षक तर आहेच, शिवाय धुतल्यानंतर निमंत्रण दिलेल्या व्यक्तीच्या उपयोगातही येणार आहे. एका पत्रिकेसाठी दामसे कुटुंबीयांना १५ रुपये खर्च आला असून देव-देवतांच्या चित्रांची विटंबना होऊ नये यासाठी पत्रिकेवर आदिवासी वारली चित्र छापण्यात आले आहे.
सध्या लग्न सराईची धूम सुरू असून लग्नकार्य म्हटल्यावर अनोख्या लग्न पत्रिकेचा विचार सुरू होतो. लग्नाची पत्रिका आकर्षक असली पाहिजे किंवा वेगळ्या धाटणीची, सर्वांपेक्षा वेगळी असली पाहिजे, अशी अनेक कुटुंबीयांची अपेक्षा असते. त्यामुळे कुणी पारंपरिक पद्धतीने, तर कुणी वेगळेपण जपत कल्पकतेने लग्नपत्रिका छापून लग्नाचे निमंत्रण देतात. आजवर अनेक आकर्षक आणि वेगवेगळ्या लग्न पत्रिका पाहिल्या असतील, पण चक्क हात रुमालावर रवींद्र दामसे यांनी छापलेली लग्न पत्रिका सर्वत्र आकर्षणाचा विषय बनली आहे.
....
पत्रिकेतून स्वच्छतेचा संदेश
आकर्षक आणि विविध रंगांच्या, सुगंध दरवळणाऱ्या अशा महागड्या लग्न पत्रिका बाजारात उपलब्ध आहेत; परंतु लग्नानंतर या पत्रिका अडगळीत पडलेल्या असतात. काही पत्रिका कचऱ्याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळे पत्रिकेवर असलेल्या देवांची विटंबना तर होतेच, शिवाय झाडापासून बनलेल्या कागदाचा ऱ्हास होतो. पर्यावरणप्रेमी असलेल्या रवींद्र दामसे आणि उज्ज्वला दामसे दाम्पत्याने वेगळेपण जपत हात रुमालावर लग्न पत्रिका छापत पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT