मुंबई

खिडकीतून कचरा टाकणाऱ्यांवर नजर

CD

घणसोली, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे नागरिकांना घराच्या खिडकीतून कचरा टाकू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र, या आवाहनाला न जुमानता काही नागरिक घराच्या खिडकीतून रस्त्यावर कचरा फेकतात. अनेकदा हा कचरा इतर रहिवाशांच्या घरावर पडत असतो. घनकचरा व्यवस्थापकांनी अशा काही सोसायट्यांची पाहणी करत नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करत असा प्रकार पुन्हा दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
नवी मुंबई शहराला स्वच्छ सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. ही स्वच्छता शहरात अशीच अबाधित राहावी, शहराचे सौंदर्य वाढावे, यासाठी महापालिकेचा घनकचरा विभाग वारंवार नागरिकांना कचऱ्याविषयी सूचना देत असते. मात्र, घनकचरा विभागाच्या आवाहनाला न जुमानता अनेक बेशिस्त नागरिक सुका, ओला कचरा रस्त्यावर फेकतात. तसेच प्लास्टिकचा कचरा घराच्या खिडकीतून खाली फेकतात. त्याच पार्श्वभूमीवर घणसोली सेक्टर ७ मधील माऊली कृपा सोसायटीची पाहणी करण्यासाठी घनकचरा विभागाचे अधिकारी गेले. या वेळी त्यांना काही नागरिक घरातील खिडकीतून पत्र्यावर कचरा टाकताना निदर्शनास आले. त्यांनी सोसायटीला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे जर अशाच प्रकारे कचरा टाकला गेला तर महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे बजावले. कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी हा कचरा स्वतः साफ करू, असे आश्वासन पालिका आणि सोसायटीला दिला.

घणसोली विभागात अनेक ठिकाणी सोसायटीतील नागरिक खिडकीतून कचरा टाकत असल्याचे निदर्शनात आले आहे. यापुढे असे प्रकार समोर आले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- संजय पाटील, घनकचरा व्यवस्थापक, घणसोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT