मुंबई

मुंबईत श्री सदस्यांचे महास्वच्छता अभियान

CD

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या लाखो श्री सदस्यांकडून आज मुंबईसह महाराष्ट्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. मुंबईतील विविध प्रमुख रस्ते, तलाव, स्मशानभूमी आदींची स्वच्छता करण्यात आली.
पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. बैठकीं उत्तम समाज घडविण्याची शिकवण देणाऱ्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरात मोठ्या संख्येने श्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत हे अभियान यशस्वी केले.

स्वच्छतेचे महत्त्‍व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता प्रतिष्ठानच्या लाखो श्री सदस्यांनी सकाळी सात ते १० वाजेपर्यंत शहरातील रस्ते, स्मशानभूमी, बस डेपो आदींची स्वच्छता करत लाखो टन कचरा गोळा केला. या वेळी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह विभागातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांसह सर्व सामान्य नागरिकांनीदेखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

येथे झाले अभियान
मुंबई उपनगरात श्री सदस्यांनी एन वार्डमधील २५, एफ नॉर्थ २१, एम ईस्ट १५, एम वेस्ट १५, एल वार्ड १० असे एकूण ८६ रस्त्यांवरील केरकचरा गोळा करत रस्ते साफ केले.
उपनगरातील १२ मुख्य पोलिस स्थानकांचीदेखील श्री सदस्यांनी झाडलोट करत पोलिस स्थानके स्वच्छ केली.
पवईतील आय टी केंद्रात सुमारे दोनशे श्री सदस्यांनी तलाव, रस्ते, मैदान स्वच्छ केली.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले. प्रत्येक जण आपले घर जसे स्वच्छ करतात; तसेच शहराची स्वच्छता केली जाते. प्रतिष्ठानच्या या कार्यातून अनेकांना खूप काही शिकायला मिळते. प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून लोकांनी स्वच्छतेचे गुण अंगिकारल्यास शहरे नेहमी स्वच्छ राहतील.
- संजय सोनवणे, सहायक आयुक्त, एन वार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT