मुंबई

एसआयटीविरोधात नाराजी

CD

खारघर, ता. २ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या वायूंच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून तीन आठवड्यांत अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत; मात्र या पथकात बहुतांश प्रदूषण महामंडळातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीत नऊशेहून अधिक कारखाने आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक केमिकल कंपन्या तळोजा औद्योगिक वसाहतीत असल्याचे सांगितले जाते. तसेच रसायनांमुळे परिसरात वसलेल्या एमआयडीसीत जल आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष म्हणजे तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांतील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार तळोज्यातील आदर्श सामाजिक संस्थेने मुंबई लोकायुक्तांकडे केली होती. १७ फेब्रुवारी रोजी लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योगांद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या वायूंच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करून तीन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे आदेश सरकारच्या पर्यावरण विभागाला दिले होते.

एसआयटीमध्ये पदाधिकारी
लोकायुक्तांच्या आदेशानुसार राज्याच्या पर्यावरण विभागाचे अवर सचिव संजय संदानशिव यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात एसआयटीमध्ये पवई येथील आयआयटी पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अभिषेक चक्रवर्ती, मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी मुंबईचे प्रादेशिक अधिकारी, तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस आणि उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी मुंबई आदींचा समावेश करण्यात आला आहे; मात्र या पथकात बहुतांश अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळातील असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

विशेष तपास पथकात बहुतांश अधिकारी हे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आहेत. त्यामुळे काहीही निष्पन्न होणार नाही. सरकारमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती; त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- राजीव सिन्हा, पदाधिकारी, आदर्श सामाजिक संस्था, तळोजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT