मुंबई

यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करा

CD

मुंबई, ता. २ : यंदा १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यादृष्टीने मुंबई महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपीच्या वापराबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या परिमंडळ २ चे उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी केले आहे. तसेच पीओपीच्या मूर्तींच्या निमित्ताने केंद्राची मार्गदर्शक तत्त्वेही पालिकेने बैठकीत स्पष्ट केली. ‘एफ दक्षिण’ विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस अधिकाऱ्यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गतवर्षी कोरोनानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्त पालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारच्या नियमावलीची सक्ती गणेश मंडळांवर करण्यात आली नव्हती; परंतु यंदा महापालिकेने नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी आतापासूनच मंडळांची मानसिकता तयार करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात नुकतीच याबाबत बैठक पार पडली. बैठकीला पोलिस उपायुक्त अकबर पठाण, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक डॉ. सुभाष दळवी, सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ॲड. नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत यांच्यासह गणेश मंडळाच्या विविध संघटना व मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---
मार्गदर्शक सूचनांवर चर्चा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे लागू करण्यात आलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवरील बंदीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती उपस्थितांना दिली. त्यावर बैठकीला उपस्थित असणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेतील मुद्दे हे राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील, असे बिरादार यांनी बैठकीदरम्यान नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT