मुंबई

एकाच दिवसात दोन मुलींच्या आत्महत्या

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : जुईनगर आणि सारसोळे भागात राहणाऱ्या दोन मुलींनी बुधवारी (ता. १) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एका मुलीने दहावीच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने; तर दुसऱ्या मुलीने वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या दोन १६ वर्षीय मुलींच्या आत्महत्येमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

जुईनगरमध्ये आई-वडिलांसह राहणारी १६ वर्षीय एकुलती एक मुलगी नेरूळमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. गुरुवारी (ता. २) तिचा दहावीचा पहिलाच पेपर होता. त्यामुळे एकांतात अभ्यास करता यावा यासाठी तिने बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आई-वडिलांना घराबाहेर पाठवून दिले होते. त्यानंतर या मुलीने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आई-वडील घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नेरूळच्या सारसोळे भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने बुधवारी भरदुपारी राहत्या घराच्या बाहेरील आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील मृत मुलगी आई आणि दोन लहान बहिणींसह सारसोळे गावात राहत होती. मूळची नेपाळी असलेली ही मुलगी शाळेत जात नव्हती; मात्र ती आईला घरकामात मदत करत होती. बुधवारी दुपारी आई व बहीण घरात असताना तिने घराबाहेरील गल्लीत गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिला शेजाऱ्यांच्या मदतीने डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मुलीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने कृत्य?
जुईनगरमधील घटनेतील मुलीने दहावीच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या मुलीने दहावीची परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अभ्यासाचा ताण घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नेरूळ पोलिसांनी दोन्ही आत्महत्यांच्या घटनांची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT