मुंबई

महर्षी दयानंद सरस्वती मार्गावरील पदपथावरील अतिक्रमण हटवले

CD

महर्षी दयानंद सरस्वती मार्ग पदपथावरील अतिक्रमण हटवले
पालिकेची अनधिकृत उपाहारगृहावर धडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः पूर्व उपनगरातील चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्ग येथील पदपथावरील अनधिकृत उपाहारगृहावर नुकतीच धडक कारवाई करीत हटवले आहे. मुंबई महापालिकेच्या एम/पश्चिम विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी हे पदपथ अतिक्रमणमुक्त झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या एम/पश्चिम विभागाअंतर्गत चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्ग (सेंट्रल अव्हेन्यू रस्ता), एचडीएफसी बॅंकेसमोरील पदपथावरील हे उपाहारगृह चार वर्षांपासून पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होते. संपूर्ण स्टील वापरून विशिष्ट आकाराचे उपाहारगृह पदपथ अतिक्रमित करून उभारण्यात आले होते. याबाबत एम-पश्चिम विभागाकडे स्थानिक नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
याच तक्रारींची दखल घेत पदपथावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय एम-पश्चिम विभागाने घेतला. यानुसार एम-पश्चिम विभाग, परिरक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य खाते, परवाना विभागाने संयुक्तपणे ही धडक मोहीम राबवत सदर पदपथ अतिक्रमणमुक्त केले. या उपाहारगृहातील गॅस सिलिंडर, भांडी व इतर सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एम-पश्चिम विभाग कार्यालयाचे १२ अभियंता, १ आरोग्य अधिकारी, वेगवेगळ्या खात्यांचे ४ कर्मचारी, २ मुकादम, १२ कामगार तसेच १ जेसीबी, १ डंपर, मेसर्स अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कर्मचारी यांनी मिळून या जागेवरील अतिक्रमण हटवले आहे. या कारवाईवेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT