मुंबई

रंगांमुळे पशू-पक्षांच्‍या जीवाला धोका !

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दोन वर्षांच्या निर्बंधातून मुक्त होत यंदाचा होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव साजरा करत असताना, पक्षी-प्राण्यांना इजा होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. धूलिवंदनाच्या दिवशी माणसाबरोबर अनेकदा मुक्या प्राण्यांनादेखील रंग लावण्यात येत असतो. मात्र, हा रासायनिक रंग प्राण्यांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे धूलिवंदनाचा आनंद घेत असताना प्राण्यांना रंग न लावण्याचे आवाहनदेखील प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, नागरिकांनी व बच्चेकंपनीने साध्या पद्धतीने धूलिवंदनाचा सण साजरा केला होता. मात्र, यंदाच्या वर्षी सण निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीदेखील बच्चे कंपनीकडून फुगे मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंग कमी आणि रासायनिक रंग लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. रंगाने खेळताना नैसर्गिक अथवा गुलालाचे रंग उधळून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन सामाजिक संस्थांकडून केले जाते; परंतु या आवाहनाला झुगारण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. माणसाला रंग लावताना काही वेळा कुत्रा, मांजर, गाय, बैल, बकरी अशा पाळीव प्राण्यावर रंग फासला जातो; मात्र हा रंग प्राण्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो. प्राण्यांच्या अंगावर पाणी पडले तरी हे पाणी जिभेने चाटून अंग कोरडे करतात. अशाच पद्धतीने अंगावर पडलेला रंग चाटल्यामुळे प्राण्यांसाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------------
विपरीत परिणामाची शक्‍यता...
कृत्रिम रंग हे प्राण्यांसाठी धोक्याचे आहेत. रंगाचे पाणी पोटात गेल्यामुळे प्राण्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अॅसिडिटी, पचनक्रियेत अडथळा येऊन यकृतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यतादेखील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
...................................
उन्हाळ्यात तहान खूप लागत असल्यामुळे पक्षी, प्राणी मिळेल ते पाणी पिऊन तृष्णा भागवतात. रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी रस्त्यावर पाणी सांडते आणि हे पाणी कुत्रा, मांजर, कबूतर, चिमणी, कावळा हे पाणी पितात. मात्र, रंगाचे पाणी प्यायल्याने पशुपक्ष्यांना ते अपायकारक ठरू शकते. रंगाने भरलेले फुगे हे पक्षी आणि प्राण्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात.
- भरत मोरे (प्राणी-पक्षी मित्र)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT