मुंबई

सुरक्षिततेला प्राधान्य देवून उत्पादन वाढवा

CD

मनोर, ता. ७ (बातमीदार) : मानवी जीवन अधिक सुखकर आणि मानवाच्या शाश्वत विकासासाठी शरीरस्वास्थ्य गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये शून्य अपघात आणि शून्य हानी लक्ष्य केंद्रित करून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. यातून उत्पादन क्षमता वाढवण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या पालघर विभागाचे सहसंचालक नरेश देवराज यांनी केले. टिमा सभागृहात आयोजित ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सुरक्षा सप्ताहाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व टीमा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सुरक्षा सप्ताहाचे आयोजन तारापूर एमआयडीसीतील टिमाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जेएसडब्ल्यू लिमिटेडच्या ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष अजय खंडेलवाल, तारापूर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टिमा) चे अध्यक्ष वेलजी गोगरी, टिमाचे माजी अध्यक्ष डी. के. राऊत, उपाध्यक्ष पापा ठाकूर, टिमा मार्गचे चेअरमन रवी भावसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विवेकानंद कदम, तारापूर अग्निशमन दलाचे अधिकारी वैभव तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते. शनिवार (ता. ४) पासून आठवडाभरापर्यंत राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सुरक्षा सप्ताहानिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT