मुंबई

मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट

CD

मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट
पार्सल वाहतुकीतून २३२.५० कोटी महसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेची चालू आर्थिक वर्षात कामगिरी प्रभावी ठरली असून, प्रवासी भाड्याव्यतिरीक्त ७६.८६ कोटी आणि पार्सलमधून २३२.५० कोटींचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. मध्य रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासी भाड्याव्यतिरिक्त सर्वाधिक महसूल असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये ४.५६ लाख टन पार्सल आणि सामान वाहतुकीतून सुमारे २३२.५० कोटी (फक्त फेब्रुवारी महिन्यातील १७.९६ कोटींसह) चे लक्षणीय उत्पन्नदेखील नोंदवले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत, वेळापत्रकानुसार पार्सल गाड्यांच्या २०१ फेऱ्यांमधून २४.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार पार्सल ट्रेनच्या ९९ फेऱ्यांमधून १४.९७ कोटी, भिवंडी-जळगाव ते आजरा ३० इंडेंट पार्सल ट्रेनच्या माध्यमातून ६.२५ कोटी आणि गोधनी ते तिनसुकिया जंक्शनपर्यंतच्या लीज पार्सल ट्रेनच्या २२ फेऱ्यांमधून ३.५९ कोटी उत्पन्न मिळवले आहे.
.................
१९१ टक्क्यांची प्रचंड वाढ
आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये मध्य रेल्वेचे नॉन-फेअर महसूल कामगिरी ७८.८६ कोटी हे गतवर्षीच्या याच कालावधीतील २७.१० कोटीच्या तुलनेत प्रभावी ठरली असून १९१ टक्क्यांची प्रचंड वाढ दर्शवत आहे, तसेच सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये सर्वाधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT