मुंबई

लोखंडी जाळीत अडकलेल्या अजगराला जीवदान

CD

नेरूळ, ता. १४ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर सेक्टर आठ येथील अंबाजी गोशाळा येथे सोमवारी (ता. १३) साप असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी फोन करून पुनर्वसू फाऊंडेशनला दिली होती. संस्थेचे सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांनी देण्यात घटनास्थळी पाहणी केली असता लोखंडी जाळीत सहा फूट लांबीचा एक अजगर अडकला होता. अजगर बराच वेळ जाळीत अडकल्याने त्याला हालचाल करणे अशक्य झाले होते. अजगराला बाहेर काढण्यासाठी लोखंडी जाळी पकडीच्या साह्याने तोडण्यात आली. प्रयत्नांची पराकष्टा करत त्या अजगराची सुखरूप सुटका करण्यात यश आले. त्यानंतर या अजगराची तपासणी करण्यात आली. त्याला जाळीमुळे किरकोळ जखमा झाल्याचे लक्षात आले. त्याच्यावर उपचार करत वन विभागाला माहिती देत त्याला सुरक्षितरीत्या जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT