मुंबई

टीजेएसबी बँकेत महिला दिन

CD

ठाणे, ता. १४ : नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने जागतिक महिला दिनाच्या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बँकेच्या राम मारुती मार्गावरील शाखेत बुधवारी (ता. ८) हा कार्यक्रम टीयर टू रिजन ने योजला होता. बँकेच्या महिला संचालिका ॲड. अनुराधा आपटे आणि डॉ. अश्विनी बापट यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महिला चळवळीतील अग्रणी, भिवंडी येथील बीएनएन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुवर्णा रावळ यांची उपस्थिती होती.

टीजेएसबी सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक सुब्बालक्ष्मी शिराळी आणि टीयर टू रिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर विनायक गोरे यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या वेळी बँकेच्या खातेदार आणि बँकेशी संलग्न असलेल्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. १९७१ मध्ये अभियंता झालेल्या झालेल्या दीपा जोशी, कर्करुग्णांचे समुपदेशन करणाऱ्या रश्मी अरविंद जोशी, नृत्यांगना मनाली देव, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात प्राविण्य संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉ. कीर्ती आगाशे, दत्तक योजनेसाठी कार्य करीत असणाऱ्या वंदना पाटील, जिम्नॅस्टिक खेळात प्रावीण्य मिळवलेल्या रुजुता जोशी, पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या स्वरांगिनी मोरे आणि बस कंडक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या पल्लवी जाधव यांना गौरवण्यात आले. बँकेच्या नौपाडा शाखेच्या शाखाधिकारी पूजा याल्लत्तिकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT