मुंबई

एसी लोकलबाबत तक्रारीत वाढ

CD

कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः एसी लोकलचे दरवाजे उघडत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली असून लोकल पकडताना प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे. या समस्येला काही प्रवाशांनी समाजमाध्यमावर वाचा फोडल्यामुळे या प्रश्नावर चर्चा झडत आहे.

कोणतेही सर्वेक्षण न करता एसी लोकल खरेदी करून त्या अक्षरशः उपनगरीय मार्गावर लादल्या जात आहेत. यामुळे लोकलमधील गर्दीने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोकल वेळापत्रकावर याचा विपरीत परिणाम होत आहे. एसी लोकलमध्ये मर्यादित प्रवासीसंख्या असतानाही या लोकलचे दरवाजे उघडत नाहीत. यामुळे प्रशासनाचा दिवाळखोरपणा उघड झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे.

दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याने एसी लोकलकडे असंख्य प्रवासी वळत आहेत. मात्र, मागील १० दिवसांपासून कल्याण-सीएसएमटी या सकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या अतिजलद वातानुकूलित लोकलचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत रेल्वेशी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup: इटली सलग तिसऱ्यांदा स्पर्धेतून बाहेर; 48 संघ खेळणार मुख्य स्पर्धा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Explained: इराण अमेरिकेची नांगी ठेचणार? प्लॅन B काय? आता जगालाही हादरा बसणार! १८ कंपन्यांना धमकीमागची खरी स्टोरी काय?

पाच दिवसांत आरोपपत्र अन् १६ दिवशी थेट निकाल! सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Ready Reckoner Rates: महायुती सरकारने रेडी रेकनर स्थिर ठेवण्याचा निर्णय का घेतला? उत्तर आलं समोर...

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT