

Illegal mining Kolhapur crime news
esakal
Dumper attack in kolhapur : खडी वाहतूक करणारे वाहन प्रांतांना सांगून पकडून दिल्याच्या संशयातून सुभाष वसंत इंगळे (६३, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) याच्या अंगावर डंपर घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या धक्कादायक घटनेत केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच इंगळे बचावले. याप्रकरणी शिवराज गंगाराम पाटील (रा. हलकर्णी) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बुधवारी (ता. १७) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.