मुंबई

अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट

CD

खारघर, ता. १४ (बातमीदार) : शहरात काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट दिसत आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे होर्डिंग अधिक असून महापालिका प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर वसाहतीत मोठ्या प्रमाणात बेकायदा लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग्जसाठीची नियमावली पायदळी तुडवली जात आहे. सिग्नल, मुख्य चौक तसेच पथदिवे, झाडांवर बॅनर लावल्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरत आहे. तळोजा वसाहतीत अनेक गृह प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यांची जाहिरात करण्यासाठी खारघरमधील उत्सव चौकाकडून सेंट्रल पार्क, टाटा हॉस्पिलमार्गे तळोजा वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकात असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. बेकायदा लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर परिसरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज दोन दिवसांत काढले जातील.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT