मुंबई

शाळांतील खोल्या आणि मैदाने भाड्याने मिळणार

CD

मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या शाळा सुटल्यावर रिकामे झालेले वर्ग खासगी ट्युशनसाठी आणि मैदाने क्रीडा प्रशिक्षण संस्था व विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या धोरणासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने समिती निर्णय घेणार आहे. पालिकेच्या शैक्षणिक कार्यक्रमाला धक्का न लावताच महसूलवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी विविध स्रोत निर्माण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका शाळांच्या इमारतीतील वर्ग सुटल्यानंतर रिकाम्या झालेल्या खोल्या खासगी संस्थांना ट्युशन घेण्यासाठी भाड्याने दिल्या जाणार आहेत. शाळांची मैदानेही क्रीडा प्रशिक्षण संस्थांना खेळासाठी आणि रविवारी व सुट्टीच्या दिवशी विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिली जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जागा कोणत्या वेळेत, किती वेळ आणि कोणाला द्यायच्या व त्यासाठी किती भाडे आकारायचे आदींसाठी धोरण ठरवण्याकरिता सहआयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी धोरण ठरवून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

पालिका शाळांतील मुलांना दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने भर दिला आहे. पालिकेच्या शाळांत बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणाऱ्या पालकांची आहेत. त्यामुळे ती शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील अशा प्रकारे दर्जेदार शिक्षण पालिका शाळांत देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टी असेल तेव्हा इमारती रिकाम्या असतात. त्या वेळी वर्गखोल्या व मैदाने भाड्याने दिली जाणार आहेत.

लवकरच समितीची नियमावली
शाळांच्या वर्गखोल्या भाड्याने देताना समिती त्याबाबतचे धोरण ठरवून नियमावली तयार करणार आहे. कोणाला भाड्याने देता येईल, किती वेळ, भाडे किती असेल इत्यादींबाबत नियमावली ठरवली जाणार आहे. लवकरच समिती त्याबाबतचा निर्णय घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT