मुंबई

मुलीकडून जन्मदात्या आईचा खून

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात एका मुलीने स्वतःच्या आईची दोन महिन्यांपूर्वी हत्या करून कपाटामध्ये आईचा मृतदेह लपवून ठेवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. वीणा प्रकाश जैन असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी आरोपी २४ वर्षीय रिंकल जैनला काळाचौकी पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री अटक केली. रिंकलने आपल्या घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे करून लपवले होते.
मृत महिलेच्या बंधूंनी अनेक दिवस बहिणीशी संपर्क न झाल्याने पोलिसांत १४ मार्चला तक्रार दाखल केली. पोलिस पथक चौकशी करण्यासाठी महिलेच्या घरी पोहोचले. रिंकलने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घरात पोलिसांना दुर्गंधी आढळली. दुर्गंधीमुळे पोलिसांचा संशय बळावला. घरात तपासणी केल्यावर राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेहाचे तुकडे आढळले. काळाचौकी पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
...
धारदार शस्त्राने वार
पोलिसांनी मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करून संपूर्ण घराचा पंचनामा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT