मुंबई

डॉ.दीपक सावंत आता एकनाथ शिंदेंसमवेत

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या डॉ. दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर दोन दिवसांपूर्वी विश्वास टाकला असतानाच आज डॉ. सावंत यांनीही ‘मातोश्री’ला जय महाराष्ट्र केला आहे. तत्कालिन आरोग्य खात्याचे मंत्रिपद सांभाळणारे डॉ. सावंत हे उद्धव ठाकरे परिवाराच्या जवळचे मानले जात. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून येत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरोग्य खात्यातील काही घडामोडींमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ते नाराज झाले होते. या नाराजीचे नेमके कारण काय, हे अद्याप गूढ आहे. त्यानंतर डॉ. सावंत यांना परिषदेची उमेदवारीही दिली गेली नाही. ‍आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य एकनाथ शिंदे करतील, याबद्दल विश्वास असल्याने आपण त्यांच्या नेतृत्वातील खऱ्या शिवसेनेत आलो आहोत, असे डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT