मुंबई

रंगीबेरंगी चित्रांनी नटली पनवेलनगरी

CD

खारघर, बातमीदार
स्वच्छता अभियान उपक्रमाअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील विविध भिंती, उड्डाणपूल आदी ठिकाणी कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे फायदे याबाबत संदेश देणारी रंगीबेरंगी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी विनामोबादला साकारलेल्या या चित्रांमुळे नटलेली पनवेल नगरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
--------------------------------------
केंद्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेमध्ये १ ते १० लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर ३४ शहरांमध्ये पनवेल महापालिकेला पाचवा क्रमांक आहे. कचरामुक्त शहरांसाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त केला आहे. येत्या वर्षात पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणात कामगिरी आखणी उंचावण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने पालिका हद्दीत स्वच्छतेची विविध कामे सुरू आहेत. यात एकीकडे पालिकेने रस्त्याच्या दुभाजकातील विद्युत खांबावर केलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे; तर दुसरीकडे शहरातील भिंतीवर आकर्षक चित्र काढून स्वच्छतेविषयी केलेली जनजागृतीदेखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या कामासाठी पनवेलमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रंगारी विभागातील सोळा विद्यार्थी ४० दिवसांपासून झटत आहेत.
------------------------------------------
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणच्या भिंतींची रंगरंगोटी करून स्वच्छता संदेशाची चित्रे रेखाटली आहेत. पालिका हद्दीत शिक्षण घेत असल्यामुळे स्वच्छतेचे संदेश देणारी चित्रे रंगवण्याची संधी प्राप्त झाली, याचेच समाधान आहे.
- पल्लवी कोंडीलकर, विद्यार्थिनी
---------------------------------------
पनवेल पालिकेकडून संस्थेत रंगकामासाठी विद्यार्थ्यांची मदत मागितली होती. त्यानुसार सोळा विद्यार्थ्यांनी सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली, कामोठे आणि खारघरमधील उड्डाणपूल तसेच विविध भिंती, रस्ते दुभाजक आणि मेट्रो मार्गाच्या दर्शनी भागात स्वच्छतेचे संदेश देणारी चित्रे रेखाटली आहे. या चित्रांचे पालिका प्रशासनानेही कौतुक केले.
- प्रमोद धाबेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT