मुंबई

तळोजा भागात गांजाची विक्री करणारा तरुण अटकेत

CD

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : तळोजा भागात गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. भावेश गोवर्धन मढवी (वय २६) असे या तरुणाचे नाव असून अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेला २ किलो १४२ ग्रॅम वजनाचा सुमारे ४३ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
तळोजा पाचनंद येथे मेट्रो रेल्वे कारशेडच्या पाठीमागे भोईरवाडा येथे राहणारा भावेश मढवी गांजा विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास मेट्रो रेल्वे कारशेडजवळ सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये २ किलो १४२ ग्रॅम वजनाचा पाने, फुले, कांड्या, बिया असलेला उग्र वासाचा गांजा आढळून आला. त्यानुसार तळोजा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये भावेशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT