मुंबई

दोन सराईत मोबाईल चोर अटकेत

CD

मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) : गोवंडी पोलिसांनी दोघा मोबाईल चोरांना पुणे व अजमेर येथून नुकतीच अटक केली. सोहेल कुरेशी ऊर्फ कालू (वय १९) याला पुण्याच्या वाकड येथून १२ मार्च रोजी आणि यामिन कुरेशी ऊर्फ मोना (वय २३) गुरुवारी (ता. १६) अजमेर येथून रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. सोहेलविरोधात दोन; तर यामिनविरोधात पाच गुन्ह्यांची नोंद आहे. हे दोघेही खार व ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये फरार होते.

चेंबूरच्या पांजरपोळ येथील चौकात ९ मार्च रोजी एक प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्या प्रवाशाने गोवंडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उपनिरीक्षक अमर चेडे आणि उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्या पथकांनी तपास सुरू केला. त्यांनी गुन्ह्याच्या परिसरातील ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील चित्रिकरणामध्ये दोघा चोरांची ओळख पटली. खबऱ्यांकडून माहितीच्या आधारे सोहेलला वाकडमधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून यामिनविषयी माहिती मिळाली. अमर चेडे हे पथकासह अजमेर येथे त्याला पकडण्यासाठी गेले असता तो भुज-बरेली एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेत पथकाने यामिनला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT