मुंबई

रस्ता आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा !

CD

वाडा, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील पूर्व विभागात असलेल्या देसई - तिळसे - बेलवड या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावर वाहने चालविणे सोडाच, तर पायी चालणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. या रस्त्यावर दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च होत असतानाही रस्ता सुस्थितीत होत नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून याचा जाब विचारला. या मोर्चाचे नेतृत्व वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीचे संयोजक प्रल्हाद शिंदे, पांडुरंग पटारे राजेश रिकामे यांनी केले. रस्ता आमच्या हक्काचा... नाही कुणाच्या बापाचा!, अरे कोण म्हणतो देणार नाय... घेतल्या शिवाय राहणार नाही, अशा अनेक घोषणांनी या वेळी तहसील कार्यालय दणाणून गेले होते.
वाडा पूर्व विभागातील देसई-तिळसे- बेलवड या १९ किमी अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून २२ गावे व ८५ पाड्यातील हजारो नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता दळणवळणाचा मुख्य स्रोत असून दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. यासंदर्भात अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून याचा जाब सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला.
शेकडो ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोर्चा स्थळी येऊन सात किलोमीटरच्या कामाला सुरुवात केली असून उर्वरित रस्त्याच्या निविदा प्रक्रियाचे काम प्रगतिपथावर असून ८ एप्रिलपर्यंत तेही काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. पी. डोंगरे यांनी दिल्याने आंदोलनकांनी मोर्चा मागे घेतला.
...
...तर उग्र आंदोलन छेडणार
देसई बेलवड रस्ता दुरूस्तीत २०१४ ते सन २०२३ पर्यंत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच रस्ता येत्या १५ एप्रिलपर्यंत सुस्थितीत न झाल्यास संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन छेडू असा गंभीर इशारा संघर्ष समितीचे संयोजक प्रल्हाद शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT