मुंबई

मानाच्या सैनिकी स्कूल परीक्षेत कळंबोलीचे यश!

CD

नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : आर्मी नेव्ही आणि एअर फोर्समध्ये भावी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी दरवर्षी ऑल इंडिया सैनिकी स्कूल परीक्षा घेतली जाते. अत्यंत कठीण आणि अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. पहिल्याच फेरीमध्ये कळंबोलीतील एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या गुणवंत मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
आपल्या पाल्यांना शिस्त लागावी, त्याचबरोबर ते उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत, या पार्श्वभूमीवर सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा आजही सर्वाधिक आहे. येथे शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी देशाच्या तिन्ही दलामध्ये उच्चपदस्थ अधिकारी होत असल्याचे रेकॉर्ड आहे. त्यासाठी अगोदर एनडीएचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याची तयारी करण्यासाठी भारतामध्ये सर्वात पहिले सैनिकी स्कूल सातारा येथे १९६१ मध्ये झाले. पाच वर्षांपूर्वी चंद्रपूरसह देशात एकूण ३३ सैनिकी शाळांची संख्या होती. आता आणखी १८ शाळांना मान्यता मिळाली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षाद्वारे होते. अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेमध्ये कळंबोलीतून यावर्षी अर्णव चिंचकर, अद्वैत माने, सर्वेश डोंबाचे, अंश देसाई, सिद्धांत खरे आणि उत्कर्ष दूधभाते या मुलांना यश मिळाले आहे. हे सर्व विद्यार्थी कळंबोली येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. दुसऱ्या फेरीमध्येही आणखी काही विद्यार्थ्यांची निवड अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT