मुंबई

कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीला अटक

CD

भिवंडी (बातमीदार) : कंपनीत काम करत असताना ट्रॉलीचा धक्का लागल्याने कामगाराने लोखंडी हॉकीबेंडचा फटका मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगाराची हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपीला भिवंडी तालुका पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली. शफाउद्दीन राहत हुसेन (वय ३१) हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत असलेल्या माल्टा कंपनीत काम करीत होता. रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे मोहंमद हनीफ इस्माईल (वय २४) आणि शफाउद्दीन कंपनीत काम होते. एका ट्रॉलीमध्ये साहित्य टाकून नेत असताना अचानक मोहंमद हनीफ याला ट्रॉलीचा धक्का लागला होता. यावरून दोघात वाद होऊन मोहंमद हनीफ याने कंपनीतील लोखंडी हॉकीबेंडच्या पाईपने शफाउद्दीनला जोरात फटका मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन शफाउद्दीन मरण पावला. त्यानंतर मोहंमद घटनास्थळावरून पसार झाला होता. तो उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्यासाठी कल्याण येथे गेला होता. पोलिस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून त्याला अटक केली. भिवंडी न्यायालयात आज (ता. २७) हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : शिवसेनेत पुन्हा भूकंप; ठाकरेंचे ६ खासदार १९ जूनला शिंदे गटात प्रवेश करणार? दिल्लीत मध्यरात्री राजकीय हालचालींना वेग

‘एसपीं’चा ‘वसूलदार’ना दणका! सोलापूर ग्रामीणमधील ७२४ पोलिसांच्या बदल्या; पण तक्रारी असलेले, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांची दूरवर बदल्या

आजचे राशिभविष्य - 17 जून 2026

17 जून 2026 पंचांग! महाराणा प्रताप जयंती, रवियोग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

Argentina vs Algeria : लिओनेल मेस्सीने इतिहास रचला! Fifa World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच; किलियन एमबापेला काही तासांत धक्का

SCROLL FOR NEXT