

Shiv sena split operation tiger
esakal
Sanjay Raut Alleges ₹15 Crore Offer to MPs : शिवसेना गटामध्ये पुन्हा एकदा फूट पडल्याचे समोर आले आहे. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहा खासदार सामील होण्याच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याचे धक्कादायक आणि घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. एक्स पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे, यामुळे ठाकरे गटात पुन्हा एका फुट पडल्याचे निश्चित मानले जात आहे.