मुंबई

रेल्वे रुळावर जिवाची बाजी

CD

जुईनगर, ता. २८ (बातमीदार) ः सानपाडा येथील कारशेडमध्ये ये-जा करणाऱ्या रेल्वे मार्गावर जुईनगर-सानपाडा येथे रस्ता मार्ग आहे. या ठिकाणी सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्यामुळे फाटक बसवण्यात आले आहे. मात्र, महिन्याभरापासून जुईनगर स्टेशनच्या बाजूला असलेले फाटक तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे; तर जुईनगर-नेरूळच्या दिशेकडील फाटक मात्र चालू असल्यामुळे घरी परतण्याच्या घाईतून रूळ ओलांडण्यासाठी जिवाची बाजी लावली जात आहे.
सानपाडा येथील कारशेडकडे जाणाऱ्या रेल्वेच्या मार्गावरच जुईनगर -सानपाडा दरम्यान रस्ता मार्ग आहे. या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे रेल्वेकडून फाटक बसवण्यात आले आहे. अनेक वेळा कारशेडच्या दिशेने रेल्वे येत असताना काही अतिउत्साही वाहनचालकांकडून रूळ ओलांडण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे फाटक बसवण्यात आले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून जुईनगर स्टेशनच्या बाजूला असलेले फाटक काही तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कामावर किंवा घरी परतणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची होत असलेली घाईमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------------------
अपघातांची मुख्य कारणे ः
- गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी रेल्वेची कार, रिक्षा तसेच बसला धडक असे छोटे-मोठे अपघात झाले आहेत; तर अनेक वेळा दुचाकीस्वारांचा जीवही थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या अशा अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने एक सुरक्षारक्षक नेमला. मात्र, प्रवासी या सुरक्षारक्षकाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
- रेल्वे रुळालगतच्या झाडीमुळे तसेच वळणामुळे रेल्वे येत असल्याचे सहज दिसत नाही; तर काही अंतरावर रेल्वे आल्यावर हॉर्नमुळे अनेकदा वाहनांवरील तोल सुटण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने कर्मचारी नेमण्याची गरज आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष मोठ्या अपघाताला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
़़़ः---------------------------------
कोट बाकी आहेत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT