मुंबई

रमजानच्‍या खरेदीसाठी कळवा, मुंब्र्यात गजबजाट

CD

कळवा, ता. २९ (बातमीदार) : मुस्लिम धर्मीयांचा पवित्र महिना समजल्‍या जाणाऱ्या रमजान महिन्यातील उपवास सुरू झाल्याने मुंब्र्यातील बाजारपेठा सध्या गजबजल्या आहेत. मुंब्रा स्थानक व कौसा अमृतनगर परिसराला संध्याकाळी बाजाराचे स्‍वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेने यंदा लवकरच २२ एप्रिलला रमजान ईद येत असल्याने मुस्लिमधर्मीयांच्या प्रत्येक घरात रोजा पाळला जात आहे.

रोज मशिदीमध्ये दिवसांतून पाच वेळा नमाज अदा केली जाते. आठवड्यातून शुक्रवारी मुस्लिमधर्मीयांचा पवित्र ग्रंथ ‘कुरहान’चे वाचन केले जाते. या महिन्यांत रोजा केल्यावर मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असल्याची त्यांची भावना आहे. दिवसभर उपवास (रोजा) असल्याने रात्री व पहाटे फळे व खजुराचे सेवन केले जाते. त्यामुळे सध्या कळवा व मुंब्र्यात फळे, खजूर व कपडे, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संध्याकाळी गर्दी होत असते. सध्या कळवा व मुंब्र्यात ठिकठिकाणी भरलेल्या बाजारात आखाती देशांमधून आलेला काळ्या रंगाचा वेगवेगळ्या प्रकारचा खजूर, ड्रायफ्रूट, मिठाई, गोड पदार्थ, जिलेबी, केळी, सफरचंद, डाळिंब, संत्री, कलिंगड यांची दुकाने सजली आहेत. रमजान महिन्यासाठी, सणासाठी सुवासिक अत्तर व कपड्यांच्या बाजारपेठा मुंब्र्यात मुंब्रा स्थानक, मुंब्रा कॉलनी, किस्मत नगर, अमृत नगर, कौसा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रमजान ईदच्‍या निमित्ताने सर्वत्र खरेदीचे वातावरण तयार झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT