मुंबई

उद्यानांमध्ये चिमुकल्यांचा हिरमोड

CD

नेरूळ, ता. १० (बातमीदार)ः शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षा पूर्ण झाल्या आहेत; तर काही शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळी सुटी लागल्याने शहरातील मैदाने, उद्यान्यांमध्ये बच्चे कंपनीमुळे गजबजली आहेत. अशातच नेरूळमधील रॉक गार्डनची दयनीय अवस्था झाली असून पैसे घेऊन उद्यानात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचा खेळाचे साहित्य नादुरुस्त असल्याने हिरमोड होत आहे.
नेरूळ येथे विस्तीर्ण अशा जागेत पालिकेने रॉक गार्डन उभारले आहे. या उद्यानामध्ये पाच वर्षांपुढील मुलांसाठी तीन रुपये, तर प्रौढांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. हिरवाईने नटलेल्या या गार्डनमध्ये प्राण्यांचे चित्र शिल्प, लहान मुलांसाठी प्ले गार्डन, प्रेक्षणीय स्थळे, मंकी पॉईंट व धबधबा असणाऱ्या शिल्पाचा रंग उडालेला आहे. उद्यानात हरिण व काळविटांची शिल्पे बसवण्यात आली आहेत; परंतु शिंगे तुटलेल्या अवस्थेत आहेत. आदिवासींची गुहा, वेगवेगळ्या कला दाखवणाऱ्या शिल्पांची दुरवस्था झाली आहे. या उद्यानात खेळांच्या साहित्याबरोबरच राशिचक्रानुसार झाडे लावण्यात आली आहेत; परंतु काही ठिकाणी राशीनुसार झाडेच नाहीत. तसेच पाणपोई असून देखील बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.
--------------------------------------
मैदानांवरही गैरसोयीचे ठाण
उद्यानांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेने उद्यानांमध्ये बच्चे कंपनीसह नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्याने विरंगुळ्यासाठी उद्यानात येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी मैदानांमध्ये गर्दी वाढत आहे. अशातच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने अनेक उद्याने, मैदानांवर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने खेळाडूंना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
---------------------------------
उद्यानातील आकर्षक अशी आदिवासी लोकांची गुहा, हत्यारांचे अवशेष नाहीसे झाले आहेत. खेळण्याचे साहित्य देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळे मुलांना जखम होण्याची भीती आहे.
- गीता शिंदे, नागरिक
-------------------------------------
लहान मुले सुट्टी लागली की रॉक गार्डनला जाण्याचा हट्ट करतात; परंतु पैसे घेऊनही या ठिकाणी योग्य प्रकारे सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
- हेरंब कदम, नागरिक
-------------------------------------
पालिकेने रॉक गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. उद्यानात ते सतत लक्ष घालतात. तसेच लवकरच उद्यानातील समस्यांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
-नितीन नार्वेकर, उपायुक्त, उद्यान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT