मुंबई

कोर्लईतील माजी सरपंचाला पोलिस कोठडी

CD

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील बेकायदा जमीन व्यवहारप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना न्यायालयाने दोन दिवसांची (ता. १३ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. मिसाळ यांना सोमवारी (ता. १०) सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली होती. मंगळवारी दुपारी मुरूड येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. दरम्यान, मिसाळ यांचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने याआधीच फेटाळून लावला आहे.

कोर्लई येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांच्यासह सात जणांविरोधात २३ फेब्रुवारीला रात्री उशिरा रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी संबंधितांनी प्रयत्न केले. त्यात मिसाळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साळाव चेकपोस्टजवळ प्रशांत मिसाळ यांना अटक केली. त्यांना मांडवा सागरी पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास मुरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सकपाळ करीत आहेत.

काय आहेत आरोप
१) कोर्लईत अन्वय नाईक यांनी सुमारे आठ एकर जागेत १९ बंगले बांधले होते. कोर्लई येथील जमीन उद्धव ठाकरे व रवींद्र वायकर कुटुंबीयांनी खरेदी केली होती. त्यानंतर ठाकरे व वायकर कुटुंबीयांनी नाईक यांच्याकडून जमीन घेतली होती.
२) रश्मी ठाकरे यांनीही गेली अनेक वर्षे या जागेची घरपट्टी भरली आहे, हे समोर आले आहे; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या कालावधीत कोर्लई येथील जमिनीच्या खरेदीचा उल्लेख निवडणूक घोषणापत्रात केला नाही.
३) जमिनीचा झालेला व्यवहार बेकायदा असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याबाबत चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT