मुंबई

३५ वर्षांपासून फरारी आरोपीला अटक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जोगेश्वरी परिसरात एकावर गंभीर हल्ला करून गेल्या ३५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला जोगेश्‍वरी पोलिसांनी गजाआड केले आहे. चिंकू प्रसाद ऊर्फ पेटबली यादव असे आरोपीचे नाव आहे. कोणतेही छायाचित्र अथवा महत्त्वपूर्ण माहिती नसताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला सापळा रचून अटक केली.
जोगेश्वरी परिसरात १९८९ मध्ये एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पेटबलीला अटक झाली होती. त्याप्रकरणी २० दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर आरोपी पेटबली बाहेर आला. त्यानंतर तो न्यायालयापुढे हजरच झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले. आरोपी केवळ जोगेश्वरीतील एका रेतीच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांकडे होती; पण त्याचे छायाचित्र पोलिसांकडे उपलब्ध नव्हते. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यात आला.

‘पेटबली’ म्हणून प्रसिद्ध
आरोपी चिंकू प्रसादला त्याचे पोट मोठे असल्यामुळे लहानपणापासूनच पेटबली नावाने ओळखले जाते. त्यावरून पोलिसांनी त्याचा माग काढला. पेटबली मूळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील तुलसीपूर येथील रहिवासी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT