मुंबई

गिधाडं निसर्गमुक्त करण्यावरून बीएनएचएसमध्ये धुसपुस?

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था मागील काही दिवसांपासून राजीनामा सत्र आणि संवर्धित केलेली गिधाडे सोडण्यावरून धुसफूस सुरू असल्याने चर्चेत आली आहे. गिधाड निसर्गात मुक्त करण्याच्या निर्णयावरून मतभेद झाल्यामुळे हे राजीनामा सत्र सुरू असल्याच्या चर्चा सुरू असतानाच बीएनएचएसने मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे हे वैयक्तिक कारणामुळे असून गिधाडे सोडण्यावरून कोणतेही मतभेद नसल्याचे बीएनएचएसने स्पष्ट केले आहे.
बीएनएचएसचे अध्यक्ष बिट्टू सहगल, उपाध्यक्षांपैकी एक आणि संचालक डॉ. बिवाश पांडव यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर उपाध्यक्ष असणाऱ्या प्रवीण परदेशी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र निधीची कमतरता आणि गिधाडसंवर्धन मोहिमेतील पक्षी जंगलात सोडण्याच्या निर्णयातील मतभेदांमुळे हे राजीनामे दिले असल्याची टीका करण्यात येत होती. या टीकेवर स्पष्टीकरण देताना बीएनएचएस संस्थेचे मानद सचिव किशोर रिठे यांनी स्पष्ट केले की, ‘अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा राजीनामा हा वैयक्तिक कारणांवरून आहे; तर डॉ. बिवाश पांडव यांचा पदस्थापना कार्यकाळ भारतीय वन्यजीव संस्थेने कमी केल्याने ते १४ मार्च रोजी त्यांच्या मूळ संस्थेत परत गेले आहेत.’
गिधाडसंवर्धन प्रकल्पासाठी संस्थेला त्या त्या राज्यातील सरकारांकडून निधी मिळतो. हा निधी तर राज्य सरकाराला केंद्राकडून मिळतो; मात्र २०२२-२३ मध्ये संस्थेला विविध राज्य सरकारांकडून निधी येण्यात झालेल्या विलंबामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. गिधाडसंवर्धन प्रकल्पातील एका केंद्रातील एका पक्ष्याच्या खाण्याचा व देखभालीचा आठवड्याचा खर्च ६ लाखांच्या आसपास आहे. २०२२-२३ मध्ये राज्य सरकारांकडून वेळेत निधीचे वितरण न झाल्याने संस्थेने हा सर्व खर्च कॉर्पस निधीतून केला; मात्र निधीची कमतरता आणि पक्षी जंगलात सोडण्याच्या निर्णयाचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे किशोर रिठे यांनी स्पष्ट केले.


आम्ही ज्या पक्ष्यांचे संवर्धन करतो ती सरकारची संपदा आहे. आम्ही फक्त रखवालदार आहोत. हीच सरकारे आता पक्षी जगवण्यासाठी, त्यांना खाद्य पुरवण्यासाठी आम्हाला पैसे पुरवत नाहीत. आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून सेंटर चालवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. खूप पाठपुरावा केला तेव्हा काही निधी आम्हाला मिळाला. मात्र अजूनही काही निधी येणे बाकी आहे. आता पक्ष्यांना अधिवासात सोडण्याबाबतचा विषय आहे. हा प्रकल्पच मुळात सुरू झाला तो गिधाड पक्ष्याची नामशेष होत चाललेली प्रजाती वाचवण्यासाठी, जो हेतू आता साध्य झालेला दिसत आहे.
- देबी गोयंका, माजी सचिव, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

-----
जिओ टॅगिंगच्या माध्यमातून लक्ष
मुळात गिधाडांचे प्रजनन करून त्यांना जंगलात सोडणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यानुसार आता देशातील चार प्रजनन केंद्रांमध्ये सुमारे ७५० गिधाडे उपलब्ध आहेत आणि ते निसर्गात मुक्त संचार करण्याचा प्रतीक्षेत आहेत. या गिधाडांना जंगलात मुक्त केले, तरी त्या पक्ष्यांवर बीएनएचएसचे जिओ टॅगिंगच्या माध्यमातून लक्ष असते, असेही बीएनएचएसने स्पष्ट केले.

---
गिधाडसंवर्धन मोहीम
१९९२-९३च्या दरम्यान देशभरात गिधाडांची संख्या कमी झाल्याचे यावर देशभरातील पक्षीमित्र, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्यात चर्चा करण्यात आल्या. या वेळी अपघाती कारणांमुळे गिधाडांची संख्या कमी होत असल्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या; मात्र १९९६ ते २००० मध्ये झालेल्या सर्वेक्षण आणि अभ्यासात असे आढळून आले की, डायक्लोफेनाक नावाच्या जनावरांना देण्यात येणारे एक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग, विशेषतः पाळीव गुरांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. अशा मृत गुरांना खाऊन जगणाऱ्या गिधाडांची किडनी खराब झाल्याने ती मरण पावली. २००६ मध्ये या औषधाच्या गुरांमधील वापरावर सर्व राज्यात बंदी घालण्यात आली. २०१० पर्यंत सर्व राज्य सरकारे या औषधांवर बंदी आणण्यात यशस्वी झाली.

---
संवर्धन प्रजनन केंद्रे
बीएनएचएसची ४ गिधाडे संवर्धन प्रजनन केंद्रे सध्या देशभरात गिधाड संवर्धनाचे काम करत आहेत. २००७ पासून संस्थेच्या गिधाड संवर्धनाच्या कामाला गती प्राप्त झाली. संस्थेने गिधाड सुरक्षित प्रदेशाची संकल्पना राबवणे सुरू केले. परिणामी, ज्या गिधाडांची संख्या ९९.९९ टक्के कमी म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर होती ती संख्या आजच्या घडीला स्थिरावली आहे किंवा वाढत आहे. दुसरीकडे संस्थेच्या प्रजनन केंद्रांमध्ये ७५०च्या आसपास गिधाडे निसर्गात मुक्त संचार करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT