मुंबई

ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या योगदानाबद्दल महापारेषणला पुरस्कार

CD

मुंबई, ता. १९ : ईक्यू इंटरनॅशनल यांच्या वतीने पुणे येथे आयोजिलेल्या सूर्याकॉन परिषदेत महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
महापारेषणने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनेत सहभागी होऊन एकूण १६ अतिउच्च दाब वाहिन्या (५९० सर्किट किलोमीटर) व ३६ संलग्न बे ची स्थापना करून एकूण ९३८ मेगावॉट एवढी अपारंपरिक ऊर्जा निष्कासित करण्यासाठी पारेषण मजबुतीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी या यशाचे श्रेय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे म्हणाले, ‘महापारेषणच्या यशाचे श्रेय मी माझ्या टीमला देतो. अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महापारेषणला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे भविष्यातही महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतील.’ केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार महापारेषण कंपनी सुमारे ३४०० कोटी रुपयांचे अपारंपरिक ऊर्जा निष्कासनाचे प्रकल्प प्रस्तावित करण्याच्या तयारीत आहे. हे प्रकल्प ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ अंतर्गत पूर्ण करण्याचे महापारेषणचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT