मुंबई

नवी मुंबईत नो पार्किंगची समस्या

CD

जुईनगर, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या शहरात वाढताना दिसून येत आहे. नवी मुंबईत वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, आशा अनेक क्षेत्रामध्ये पार्किंग, नो पार्किंग झोन केले आहेत. पण, कुठेही, कशाही पद्धतीने वाहचालक बेकायदेशीर पार्किंग करत असल्याचे दिसत आहे. पालिकेने नागरिकांसाठी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करून दिली असली तरी सानपाडा, जुईनगर व नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर नो पार्कींग क्षेत्रात दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई शहरात लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. नियोजबद्ध शहर म्हणून नवी मुंबई शहराची गणना होत असली तरी दिवसेंदिवस नो पार्कींगमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर येत आहेत. शहराबाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी सतत वाढती आहे. रस्याच्या कडेला बेकायदा पार्किंग होऊ नये यासाठी वाहने पार्किंगकरिता शहरातील जागा निश्चित करून पार्किंग, नो पार्किंग झोन निश्चित केले आहेत. मात्र, जिथे नो पार्किंगचे बोर्ड आहेत तिथेच वाहने पार्क केली जातात. या झोनची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. शहरात वाढती लोकसंख्या आणि पार्किंगचे नियोजन नसल्याने याचा ताण वाहतूकीवर पडताना दिसत आहे. त्यात वाहतूक पोलिस देखील अशा वाहनांकडे दुर्लक्ष करत आहेत.

नो पार्किंगमध्ये वाहने लावल्यास वाहनांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिस करतात. मुख्य रस्त्यांवर बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत असून गोंधळ होत आहे.
मुख्य रस्त्याजवळ असलेली दुकाने, शोरूम, हॉटेल, बियर बारसह कार्यालयांमध्ये येणारे लोक तिथेच दुचाकी, चारचाकी वाहने पार्क करतात. बाजार क्षेत्रातील परिसरात देखील नो पार्किंगची समस्या गंभीर आहे. महापालिकेच्या वतीने नो पार्किंगचे फलक लाऊनही काही नागरिक या नियमांचे उल्लंघन करत असून वाहतूक पोलिसांची कारवाईदेखील मंदावलेली पाहायला मिळत आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहणे पार्क करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: पुणेकरांनो, उद्या 'या' मार्गाने जाऊ नका; ईद मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 11 लाखांचा मदत निधी जाहीर

Zilla Parishad School: ‘गुरुजी परत द्या, नाहीतर ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक

SCROLL FOR NEXT