मुंबई

वाळवणीच्या पदार्थांची लगबग

CD

शुभांगी पाटील/सकाळ वृत्तसेवा
तुर्भे, ता. २२ ः उन्हाळा सुरू झाला की विविध उन्हाळी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी महिलांची घरोघरी लगबग सुरू होते. शेवया, पापड, वेफर्स याबरोबरच विविध मसाले महिलांकडून बनवले जातात. नवी मुंबईतही महिलांची उन्हाळी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

नवी मुंबईत अनेक घरांमध्ये महिला घरगुती पदार्थ बनवण्याच्या कामी व्यग्र दिसत आहेत. यात पापड, कुरडया, शेवया, वेफर्स, चकल्या, वडे असे विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. हे पदार्थ बनवणय्साठी उडदाची दाळ, कुरडयांचे गहू, नागली, साबुदाणा, बटाटा वगैरे पदार्थांची खरेदी केली जाते. शेवयांसाठी एमपी सिहोर आणि सुपर लोकवन या गव्हांना महिला जास्त पसंती देत आहेत. तर पापडासाठी जुना बटाटा वापरण्यावर महिलांचा भर आहे. याशिवाय ताकात भिजवलेल्या पोपटी मसाला मिरच्या अनेक घरांच्या छतांवर दिसत आहेत. तर कुठेकुठे आमरसाच्या पोळ्यांची ताटेही बाल्कनीत अथवा ग्रिलमध्ये पहायला मिळतात. कुणी मिरच्या भरून सुकवतात, तर कुणी वाफेवर तांदळाचे पापड बनवून सुकवीत आहेत. यासाठी बच्चे कंपनी आपल्या आईला मदत करताना दिसत आहेत. याशिवाय लाल मसाला बनवण्यासाठी महिलांची मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे.

अनेक महिलांना नोकरीमुळे उन्हाळी पदार्थ घरी बनवणे शक्य नाही. त्यामुळे त्या इतर महिलांनी घरी बनवलेले पदार्थ खरेदी करणे पसंद करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या महिलांसाठी हा एक छोटासा व्यवसायच सुरू झाला आहे. अनेक ठिकाणांहून पदार्थांना मागणी येत असल्याने या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर खाद्यपदार्थ बनवण्यावर त्यांचा भर आहे.
---
यंत्रामुळे मेहनत घटली
आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले आहे. त्यामुळे रोजगार तयार झाला आहे. तसेच पापड तयार करण्याची मशीन आल्याने महिलांची मेहनत कमी झाली आहे. काही महिला रोजंदारीवर मदत करीत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे. कोपरखैरणे परिसरात तर शेवया व पापड बनवण्याची मशीन असल्याने याठिकाणी महिलांची गर्दी पहावयास मिळत आहे. तांदूळ किंवा इतर धान्य देऊन त्याठिकाणी आपल्याला हव्या त्या जिन्नस करून मिळत आहेत.
---
घरातच वळवणीचे पदार्थ बनवले जात आहेत. घरगुती पदार्थ हे बाहेरून खरेदी करण्यापेक्षा खूपच स्वस्त पडतात.
- रंजना माळी, घणसोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT