मुंबई

पश्चिम रेल्वेवर आज पॉवरब्लॉक

CD

मुंबई, ता. २२ : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते सफाळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचे पाच गर्डर टाकण्यासाठी उद्या (ता. २३) पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहेत; तर काही मेल-एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वैतरणा-सफाळे स्थानकांदरम्यान रोडओव्हर पुलाच्या बांधकामासाठी पाच गर्डर टाकण्यात येणार आहेत. उद्या सकाळी ८.५५ ते सकाळी १०.५५ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वे क्रमांक ०१३३७ बोईसर-वसई रोड मेमू आणि दुपारी १२ वाजताची विरार-चर्चगेट लोकल रद्द असणार आहे. ट्रेन क्रमांक ०१३३८ डोंबिवली-बोईसर मेमू वसई रोड ते बोईसर, ट्रेन क्रमांक ९३००८ डहाणू रोड-बोरिवली लोकल केळवे रोड ते बोरिवलीदरम्यान रद्द केली आहे. ट्रेन क्रमांक ९३००९ चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोडदरम्यान धावणार आहे. ट्रेन क्रमांक ९३०१० डहाणू रोड-विरार लोकल केळवे रोड ते विरारदरम्यान रद्द केली आहे. ९३०११ चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोडदरम्यान धावणार आहे.

शॉर्ट टर्मिनेट गाड्या
ट्रेन क्रमांक १९००२ सुरत-विरार एक्स्प्रेस पालघर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९१४३ विरार-वलसाड गाडी विरार ते पालघरदरम्यान रद्द केली आहे. याशिवाय ट्रेन क्रमांक २२९६६ भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस, १२४७९ जोधपूर-वांद्रे टर्मिनस सूर्या नगरी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२९५६ भूज-वांद्रे टर्मिनस कच्छ एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२४८९ बिकानेर-दादर एक्स्प्रेस, ट्रेन १९५७८ जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस उशिरा धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT