मुंबई

एकवीरा देवीचे माहेरघर चौलचे भगवती मंदिर

CD

श्रद्धा स्थान
अभय आपटे, रेवदंडा

एकवीरा देवीचे माहेरघर चौलचे भगवती मंदिर

अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा मल्हारी मार्तंड खंडेराया, तर कुलस्वामिनी भवानी माता आहे. आई भवानीचेच रूप भगवती, श्री एकविरा देवी आहे. आश्विन आणि चैत्र महिन्यात देवीचे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरे केले जातात. हिंदु नववर्षाची सुरुवात आदिमातेच्या चैत्र नवरात्र उत्सवाने होते. अलिबाग तालुक्यातील चौल येथील एकवीरा भगवती देवीचाही नवरात्रोत्सव चैत्र महिन्यात साजरा करण्यात आलो.

एकवीरा देवीची चंदनाची पालखी अलिबाग तालुक्यातील (अष्टागर) चौल-आग्राव गावात असते. चैत्र नवरात्रोत्सवातील ही परंपरा आहे. चौल भगवती संदर्भ एकवीरा देवीशी येतो. याचे कारण आई एकवीरा देवीचे माहेर म्हणून भगवती मंदिराचा संदर्भ आहे. हे मंदिर जणू किल्ल्याप्रमाणे भासते. चौल नाका ते वावे रस्त्यावरील भोवाळे गावाच्या उजव्या बाजूला हे पुरातन मंदिर आहे. दाट वृक्षराजीमुळे वृक्षांनी या मंदिरावर कमानी उभारल्याचा भास होतो. या मंदिराचा जिर्णोद्धार १७५१ मध्ये झाल्याचा उल्लेख सापडतो. चौल परिसराचे ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक महत्त्व लक्षात घेता येथील शितलादेवी, महाकाली, हिंगुळजादेवी, काळभैरव ही प्राचीन मंदिरे इतिहासाची साक्ष देत आहेत. आश्विन महिन्यातील नवरात्रात मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या कुटुंबाची कुलस्वामिनी आहे ते तिच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.


असे आहे. मंदिर
एकवीरा भगवती मंदिर पुरातन आहेच. गाभाऱ्यात देवीच्या बाजूला तिच्या रक्षणासाठी जी मूर्ती आहे ती विर (शिपाई) म्हणून ओळखली जाते. मंदिरातील खांब अद्याप लाकडी असून कोरीव आहेत. छोटासा तलाव असून, तेथे शंकराचे मंदिर आहे.

भक्तांची मांदियाळी
आश्विन, चैत्र व पौष या तीन महिन्यांत देवीघटी (नवरात्र) देवी बसतात. लोणावळा-कार्ला येथील एकवीरा ही मोठी बहीण आहे. कोळीबांधव पहिला मान एकवीरा भगवतीला देतात आणि नंतर कार्ला येथे जातात. कौल लावण्यासाठी भक्तमंडळी मोठ्या संख्येने येतात. कोळी बांधव नारळी पौर्णिमेला नौका समुद्रात लोटण्याआधी दर्शनाला येतात. मत्स्य दुष्काळ पडला, तर साकडे घालायलाही भाविक एकवीरा भगवतीकडे येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT