मुंबई

करवाढीच्या विरोधात काँग्रेसही दंड थोपटले

CD

भाईंदर, ता. २५ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेने केलेल्या करवाढीला भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला असताना आता काँग्रेसनेही करवाढी विरोधात दंड थोपटले आहेत. करवाढीचा निर्णय रद्द करून सर्वसामान्य करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा जनहितार्थ काँग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी दिला आहे.
कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्याचे आयुक्तांनी जाहीर केल्यानंतरही आता नव्याने दहा टक्के रस्ता कर, दहा टक्के पाणीपुरवठा लाभ कर, २३ ते ३० टक्के पाणीपट्टी मध्ये वाढ, अर्धा टक्का अग्निशमन सेवा करवाढ अशा प्रकारचे कर वाढीचे प्रशासकीय निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. मग आता अचानकपणे करवाढ का केली जात आहे, असा सवाल करुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी राज्यात एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार असतानाही कर वाढीविरोधात भाजपला आंदोलन करण्याची वेळ येते हे दूर्दैव आहे अशी टीका केली.
प्रशासकीय राजवट असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने करवाढ केली आहे ती अयोग्य असून याबाबतीत सकारात्मक विचार करून करवाढीचा निर्णय रद्द करावा व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. यावेळी सामंत यांच्यासह माजी नगरसेविक जुबेर इनामदार, नगरसेविका मर्लिन डीसा, रुबिना शेख, गीता परदेशी, प्रवक्ते प्रकाश नागणे तसेच अन्य पदाधिकाऱ्‍यांनी आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT