मुंबई

ज्येष्ठांना नाकाद्वारे मिळणार बूस्टर डोस

CD

भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमधील वरिष्ठ नागरिकांना पहिल्यांदाच इन्कोव्हॅक या नाकाद्वारे घ्यायच्या कोविड लशीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही लस सर्व लसीकरण केंद्रांवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमात नाकावाटे घ्यायच्या इन्कोव्हॅक लशीचा समावेश करण्यात आला आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लशीमुळे पेशींची रोगप्रतिकारक्षमता वाढणार असून ही लस थेट स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे न देता नाकाद्वारे दिली जाणार आहे. सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षांवरील नागरिकांना जास्तीत जास्त सहव्याधी असल्याने व ते अतिजोखमीचे या गटात मोडत असल्यामुळे प्राथमिक स्तरावर इन्कोव्हॅक या लसीचा वापर त्यांच्यासाठी बूस्टर (प्रिकॉशन) डोस म्हणून करण्यात येणार आहे.
कोविशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने पूर्ण झालेले ६० वर्षांवरील लाभार्थी या बूस्टर डोसकरिता पात्र असणार आहेत. या लसीचे डोस मिरा-भाईंदर शहरातील सर्व कोविड लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनामार्फत या लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठीची कोविन कार्यप्रणालीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या सत्रांबाबतची माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. ६० वर्षांवरील बूस्टर डोसकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हा डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेतल्याचा पुरावा तसेच वयाच्या पुराव्यासाठी कार्यालयीन ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी ओळखपत्रे कोविड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे.
....
इन्कोव्हॅक लशीचे दीडशे डोस उपलब्ध
सध्या महापालिकेकडे इन्कोव्हॅक या लशीचे दीडशे डोस उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत एकंदर ९० हजार ७५२ वरिष्ठ नागरिकांनी लशीचा पहिला डोस व ८४ हजार ७१९ वरिष्ठ नागरिकांनी दूसरा डोस घेतला आहे, परंतु बूस्टर डोस घेण्यासाठी मात्र वरिष्ठ नागरिकांनी फारशी उत्सुकता दर्शवलेली नाही. ३६ हजार ३९१ एवढ्याच वरिष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
....
कोविशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या व अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांनी शासकीय कोविड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन बूस्टर डोस घ्यावा व स्वतःला कोविड संरक्षित करून घ्यावे.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT