मुंबई

मुंबईतील माजी नगरसेवक अस्वस्थ

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच बंडखोरी झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्यास इच्छुक आहेत; परंतु शिंदे सरकार राहील की जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सज्ज असलेल्या माजी नगरसेवकांच्या मनात अस्वस्थता सुरू आहे. अनेक जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक दिवाळीच्या दरम्यान लागण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या मदतीने शिंदे यांची शिवसेना ठाकरे यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात मुसंडी मारण्याची तयारी करत आहे. त्यात ठाकरे गटातील माजी नगरसेकांनी आपणास पुन्हा उमेदवारी मिळावी यादृष्टाने प्रयत्न सुरू केले आहेत. २२७ प्रभाग संख्येनुसार माजी नगरसेवकांनी काम सुरू केले आहे. काही दिवसांपासून शिंदे सरकारमध्ये अस्थिरतेची चर्चा आहे. हे सरकार राहील की जाईल याविषयी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही चलबिचल अधिकच वाढल्याचे समजते.

भाजप-शिंदे गटाची फिल्डिंग
ठाकरे गटाची पडझड करण्याचे शिंदे गटाचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने शिंदे गटातील आमदार, खासदार कामाला लागले आहेत; मात्र निवडणूक लांबल्यामुळे माजी नगरसेवक कोणतेही धाडस करायला तयार नाहीत. निवडणूक टप्प्यात आल्यास ठाकरे गटातील अधिकाधिक माजी नगरसेवकांना खेचण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा राहणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने भाजप आणि शिंदे गटाने आतापासूनच फिल्डिंग लावल्याचे समजते. ज्या माजी नगरसेवकांना शिवसेनेची (ठाकरे) उमेदवारी मिळणार नाही, अशांनाही आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न राहणार असल्याचे शिंदे गटातून बोलले जात आहे.

उमेदवारीसाठी पर्याय
गेली तीनचार टर्म अनेक नगरसेवक सातत्याने निवडून आले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीवर टाच येऊ नये त्यासाठी ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक धास्तावले आहेत. त्यांच्याही मनात चलबिचल सुरू आहे. ते निवडणूक टप्प्यात येताच शिंदे गटात उडी मारण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्यास त्यांनीही पर्याय ठेवले आहेत. कोणत्या पक्षाची उमेदवारी प्राधान्यक्रमाने मिळवायची, अशी तयारीही माजी नगरसेवकांनी केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT