मुंबई

भांडुपमध्ये रस्त्यावर पाणी

CD

भांडुप, ता. २९ (बातमीदार) ः मुंबईत काही दिवसांपूर्वीच १५ टक्के पाणीकपात करण्यात आली होती. त्‍यामुळे नागरिकांसमोर पाणीसंकट उभे राहिले होते. आजही भांडुप परिसरातील काही विभागांत पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. अशातच एस वॉर्डसमोरील रस्त्यावर गेले काही दिवस झाले पाणी गळती सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. सुरुवातीला पालिकेने ड्रेनेज वाहिनीतून गळती होत असल्‍याचे सांगितले होते; मात्र शुक्रवारी (ता. २९) येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
रस्‍त्‍यावर वाहत असलेल्‍या पाण्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना येथून प्रवास करणे कठीण जात आहे. मागील काही दिवसांपासून भांडुप परिसरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भांडुप पश्चिमेला लाखांहून अधिक लोकवस्ती आहे. काही ठिकाणी डोंगराळ भागात लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. असे असताना पालिकेच्‍या कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. लवकरात लवकर पाणीगळती बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पाणीकपातीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पाणीगळती होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.
- संतोष पार्टे, उपाध्यक्ष, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना महाराष्ट्र

एस वॉर्डसमोरील मलवहिनी पाईपलाईन तपासली आहे. येथील पाण्याची गळती ही मलवाहिनीची नसून शुद्ध पाण्याची पाईपलाईन लीकेज असल्याने होत आहे.
- चेतन पाटील, मुख्य मलवहिनी दुय्यम अभियंता पूर्व उपनगरे पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT