मुंबई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

CD

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार कोपरखैरणे वाहतूक शाखेने एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या एकूण १९९० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त वाहनचालकांवर होत असलेल्या कारवाईनंतर आता नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर विशेष मोहीम राबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाईदेखील केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत कोपरखैरणे वाहतूक शाखेने विनाहेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, नो पार्किंग असे वाहतूक नियम न पाळणाऱ्या एकूण १९९० वाहनांवर कारवाई करून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांनी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन, घणसोली रेल्वे स्टेशन येथील वाहतुकीची समस्यादेखील सोडवल्यामुळे नागरिकांमधूनदेखील याबाबत ट्विटद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटून वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

नागरिकांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करायला हवे. वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांवर या पुढील काळातदेखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.
- विश्वास भिंगारदिवे, सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT