मुंबई

सलग सहाव्या दिवशी तेजी

CD

मुंबई, ता. २ : जागतिक शेअर बाजार संमिश्र कल दाखवत असूनही देशांतर्गत चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे आज भारतीय शेअर बाजारांनी सलग सहाव्या दिवशी नफा नोंदवला. सेन्सेक्स २४२.२७ अंश; तर निफ्टी ८२.६५ अंश वाढला.
आजच्या तेजीमुळे ‘बीएसई’वरील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण सर्व शेअरचे मूल्य १.६३ लाख कोटी रुपयांनी वाढले. शुक्रवारी या सर्व शेअरचे एकूण मूल्य २७१.८२ लाख कोटी रुपये होते; तर आज ते २७३.४५ लाख कोटी रुपये झाले. आज दिवसभर शेअर बाजार ठराविक पातळीतच फिरत होते; मात्र निफ्टी आज अठरा हजारांच्या खाली घसरला नाही; तसेच सेन्सेक्सही ६१,२५० च्या वरच टिकून राहिला. आज एफएमसीजी आणि औषधनिर्मिती क्षेत्राच्या शेअरनी तोटा दाखवला, तर ऑईल अँड गॅस, आयटी, धातूनिर्मिती कंपन्या, बँका तसेच वाहननिर्मिती कंपन्या नफ्यात होत्या. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,३५४.७१ अंशांवर, तर निफ्टी १८,१४७.६५ अंशांवर स्थिरावला.


............
भारतातील कंपन्यांचा उत्पादन तपशील चांगला आला; तसेच जीएसटीची वसुलीही विक्रमी झाल्यामुळे आज शेअर बाजार तेजीत होते. गेले काही दिवस शेअर बाजार विलक्षण मजबुती दाखवत असून तो आता तेजीच्या नव्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे. अमेरिकी फेडरल बँक आणि युरोपीय मध्यवर्ती बँकांच्या बैठकानंतर पुढील तेजीच्या आवर्तनात शेअरबाजार प्रवेश करतील.

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

रुपया सहा पैसे घसरला
................................
आज देशांतर्गत शेअरबाजार तेजी दाखवत होते तरीही अमेरिकी फेडरल बँकेच्या आगामी बैठकीमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सहा पैसे घसरून ८१.८८ वर स्थिरावला. आज व्यवहाराला सुरुवात होताच रुपया ८१.७५ वर उघडला होता. व्यवहारादरम्यान तो ८१.७२ अशा उच्चांकी स्तरावर आणि ८१.९५ अशा नीचांकी स्तरावर गेला होता. शुक्रवारी रुपया ८१.८२ वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Weekly Tarot Horoscope : 'या' आठवड्यात तयार होतोय गजकेसरी राजयोग; 4 राशींच्या सुखात होणार भरभराट !

Satara News : पुणे-बंगळुरु महामार्गावरील मोहिम फत्ते; वाहनधारकांचा जीव पडला भांड्यात!

Mumbai Metro: मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार, कुठून कुठे असणार?

SCROLL FOR NEXT